स्वामी माधवनाथ

स्वामी माधवनाथ तथा श्री.माधव विष्णू उर्फ बाळासाहेब वाकडे यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१७ रोजी कोकबन येथे झाला. वयाच्या १० व्या वर्षापासूनच त्यांनी भगवतगीतेचा अभ्यास सुरु केला.वडिलांच्या आकस्मिक  निधनानंतर   त्यांनी आपले गाव सोडून पुण्याला येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांचे वय अवघे १७वर्षे होते. आपल्या आई व भगिनी सोबत पुण्यासारख्या नवीन ठिकाणी त्यांनी आपल्याआयुष्याला सुरुवात केली. प्रथम टेलरिंग व नंतर कापडाचे दुकान सुरु केले. १९३९मध्ये आपली बालमैत्रीण सरोजिनी (मातोश्री सरलाताई) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.एक आदर्श संसारी आयुष्य जगत असतानाच बाळासाहेबांनी ध्यान व नामाचा अभ्यास केला.त्याच बरोबर त्यांनी ज्ञानेश्वरी व दासबोधाचा अभ्यास सुरु केला .

१९५८ मध्ये बाळासाहेबांनी स्वांत: सुखाय ज्ञानेश्वरीच्या प्रवचनांना सुरुवात केली . १९६८ साली त्यांना  पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचा अनुग्रह लाभला . पुढे १९७३ साली स्वामी स्वरूपानंदानी नाथ संप्रदायाचे उत्तराधिकार प्रदान केले व स्वामी माधवनाथ ह्यानावाने हा संप्रदाय पुढे चालवण्यास सांगितले. स्वामी माधवनाथानी अनेक साधकांना अनुग्रहित केले व त्यांच्या पारमार्थिक उन्नतीसाठी त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी अनेक प्रवचने, सत्संग यामार्फत पुणे व महाराष्ट्रातील अनेक साधकांना मार्गदर्शन केले व परमार्थ मार्गावर स्थिर केले. स्वामीजींचे विचारधन त्यांच्या ग्रंथ संपदा, ऑडीओ व व्हिडिओ सीडी मध्ये उपलब्धआहेत. 

आपल्या प्रवचनातून  त्यांनी आयुष्यातील परमार्थाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे अनेक तरुण साधक स्वामीजींचे शिष्य बनले. या तरुण साधकांवर त्यांचे विशेष लक्ष होते व त्यांना प्रेमाने घडविण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

१९९१मध्ये अर्धांग वायूचा झटका येऊन देखील स्वामीजींच्या उत्साहात फरक पडला नाही.अनुग्रह, प्रवचने व सत्संग याद्वारे प्रबोधन चालूच होते. ३० जुलै १९९६ ला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी माधवनाथांनी आपला देह सद्गुरुचरणी विलीन केला. स्वामीजींचे उत्तराधिकारी स्वामी मकरंदनाथ वझे आणि स्वामी माधवानंद नगरकर  हे संप्रदायाचे कार्य पुढे चालवत आहेत.


सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना