स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस
(जि. रत्नागिरी)
सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था
नोंदणी क्र.प. ट्र. एफ -११२ (रत्नागिरी)
मु. पो. पावस, ता. जि. रत्नागिरी - ४१५ ६१६ महाराष्ट्र


समाधी मंदिर : ०२३५२-२३७२५८ / ०२३५२-२३७१५८
भक्तनिवास : ०२३५२ -२३७३३६
आरोग्यकेंद्र / स्वरूपाश्रम : ०२३५२ -२३७३३४
साधकभवन : ०२३५२ -२३७५५८
ई-मेल : swamiseva39@gmail.com

* Indicates required fields

भारतामध्ये महाराष्ट्र हे अत्यंत प्रगत राज्य असून महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोकणाचा खूप मोठा हातभार आहे. काश्मीर नंतर कोकण हे द्वितीय क्रमांकाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते. कोकणच्या किनारपट्टीवर असणाऱ्या बंदरांमधून महाराष्ट्राचा व्यापार होत आहे. अरबी समुद्राच्या किनारी वसलेले रत्‍नागिरी हे कोकणातील एक प्रमुख बंदर आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील विविध शहरांशी हे  जोडलेले  आहे.  रत्‍नागिरी  हे  हापूस  आंबा,  काजू,  नारळ, भात, इ. साठी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा येथील महत्त्वाचा व्यवसाय आहे. राष्ट्रीय महामार्ग १७ (मुंबई-गोवा महामार्ग) हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून धावणारा प्रमुख महामार्ग तसेच रत्नागिरीला कोल्हापूरसोबत जोडणारा राष्ट्रीय महामार्ग २०४ हे प्रमुख रस्ते रत्‍नागिरीमध्ये मिळतात. अनेक पर्यटन स्थळे असणाऱ्या या जिल्ह्यात रत्नागिरीपासून जवळच स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले श्री क्षेत्र पावस हे गाव आहे. 


महामार्गाने जाण्यासाठी - रत्नागिरी हे पावस जवळील मोठे शहर आहे. रत्नागिरीहून श्री क्षेत्र पावस साधारणपणे १५ कि.मी. अंतरावर आहे. रत्नागिरी स्टॅंडवरून सकाळी ६ वाजल्यापासून पावसला जाण्यासाठी गावखडी, नाखरे, पूर्णगड,आडिवरे इ. बस मिळतात. तसेच स्वतंत्र रिक्षा करून देखील पावसला जाता येते. 

कोल्हापूर हे रत्नागिरी जवळील मोठे शहर असून कोल्हापूर ते रत्नागिरी हे अंतर १३५ कि.मी. आहे. कोल्हापूर बसस्टँड वरून रत्नागिरीला जाण्यासाठी पाऊण ते एक तासाने थेट गाड्या आहेत. तसेच कोल्हापूरहून रत्नागिरीला जाण्यासाठी खाजगी बस, गाड्या तसेच टॅक्सीसुद्धा उपलब्ध आहेत.

कोल्हापूर - रत्नागिरी - १३५ कि.मी.

पुणे - रत्नागिरी - ३०० कि.मी.

मुंबई - रत्नागिरी - ३५० - ४०० कि.मी.

पणजी - रत्नागिरी - २४० कि. मी.

 

रेल्वेने जाण्यासाठी – रत्‍नागिरी रेल्वेस्थानक हे कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथून मुंबई, दिल्ली तसेच दक्षिणेकडील अनेक राज्यांत प्रवास करण्यासाठी थेट रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. दादर, पुणे, मडगाव, दिल्ली, पटना, राजस्थान, गुजरात, केरळ, या सर्व ठिकाणाहून रेल्वेने रत्नागिरीला पोचता येते. रत्नागिरीला जाण्यासाठी दादर येथून थेट पॅसेंजर आहे. या शिवाय केरळ,कोकणात जाणाऱ्या अनेक गाडयांना रत्नागिरी हा थांबा आहे. स्टेशनच्या बाहेर रिक्षा मिळतात. त्याने बसस्टॅंडवर येऊन तेथून बसने पावसला  येता येते.

विमानाने जाण्यासाठी - रत्नागिरीला येण्यासाठी कोल्हापूर हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. कोल्हापूरला मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद येथून विमानाने येता येते. कोल्हापूर विमानतळावरून बसस्टँडला येऊन बसने रत्नागिरीला जाता येते.


सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना