संस्थेच्या प्रगतीचा आलेख स्वामी कृपेमुळे सतत वाढत आहे. प.पू.स्वामीं वरील निष्ठा, भक्ती, प्रेम दिवसेंदिवस स्वामीभक्तांमध्ये वाढत आहे. दर्शनार्थी भाविकांना येथील शांतता,प्रसन्नता व प.पू. स्वामींच्या दर्शनाने होणारा आनंद द्विगुणित होत आहे. मंदिरात येणारी दर्शनार्थी भक्तांची मांदियाळी दिवसेंदिवस वाढतच आहे. प.पू.स्वामींच्या शिकवणीनुसार मंदिरातील शांतता, पावित्र्य,शिस्त व रामकृष्णहरिमय वातावरणामुळे स्वामीभक्त तृप्त होतात व समाधान पावतात. दुपारच्या आरती नंतर मूगडाळ-तांदळाच्या खिचडीचा प्रसाद दिला जातो. मंडळाच्या या खिचडी प्रसाद योजनेत आरंभापासून श्री. बाबूराव (श्री. श्रीकांत देसाई) यांचे योगदान असते व देसाई कुटुंबीय आस्थेने त्यात लक्ष घालतात. संस्थेच्या उद्दिष्ट पूर्ततेच्या दृष्टीने कार्यकारी मंडळ सतत प्रयत्न करीत असते याची प्रचिती पावसला येणारे स्वामीभक्त घेत असतात. स्वामी मंदिर आणि त्या परिसरातील सोयीसुविधाया भक्तांच्या उदार देणगीतून झालेल्या आहेत.

देणगीरूपाने जमलेला निधी हा स्वामींच्या वाङ्मयाची अल्प मूल्यात उपलब्धता, प्रसार, प्रचार, स्वामी भक्तांच्या व्यवस्थापनासाठी, अन्नदानासाठी, आरोग्यसेवा, औषधोपचारासाठी, शैक्षणिक मदतीसाठी व महिलांसाठी शिवणकाम-भरतकाम-विणकाम वर्ग चालवण्यासाठी वापरण्यात येतो. खर्च करताना कोठेही अनाठायी खर्च होणार नाही याकडे कार्यकारी मंडळाचे सदस्य काटेकोरपणे लक्ष ठेवीत असतात.


सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना