पावस - रत्नागिरी रस्त्यावर पावसपासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर स्वरूप आमराई उभारण्यात आली आहे. गोळप गावातील श्री. धोंडदेव वासुदेव जोशी व श्री. कृष्णाजी वासुदेव जोशी या बंधूंनी सुमारे १५ एकर जागा संस्थेला देणगी स्वरूप दिली. त्या जागेवर हापूसची ७०० कलमे लावण्यात आली. शिवाय केळी आणि इतर काही भाज्यांची लागवड करण्यात आली. सुमारे सहाशे भक्तांनी प्रत्येकी २०००/- रू. एका कलमासाठी दिले असून या भक्तांच्या आर्थिक योगदानातूनच ही कलमांची बाग निर्माण करण्यात आलेली आहे. या बागेपासून संस्थेला कायमस्वरूपी उत्पन्न मिळत आहे. संस्थेचे कायम विश्वस्त श्री. जयंत देसाई यांनी ह्या स्वरूप आमराईच्या कामीविशेष पुढाकार घेतला.