भक्तनिवासाच्या परिसरातच गोशाळा बांधण्यात आलेली आहे. इथे सुमारे ९ ते १० गायी असून या गायींच्या दुधाचाच स्वामींच्या समाधीवर रोज अभिषेक केला जातो. त्याशिवाय या गोशाळेतून येणारे सर्व दूध स्वामींच्या पूजेसाठी वापरले जाणारे पंचामृत, अभिषेक, रोजचे भोजन-महाप्रसाद तसेच स्वामींच्या भक्तांसाठीच वापरले जाते.