दोन्ही बाजूंनी चढण्या - उतरण्यासाठी पायऱ्या असलेलीही ध्यानगुंफा. श्री स्वामी समाधी चौथऱ्याच्या समोरच ही ध्यानगुंफा आहे. एकावेळी कमीत कमी अर्धा तास ध्यानासाठी बसू शकणाऱ्या इथे प्रवेश दिला जातो. येथे प. पू.स्वामीजींचा देह धर्मसिंधू ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे चंदन, कस्तुरी, केशर, निरनिराळ्या प्रकारची अत्तरे व शुद्ध कापूर यामध्ये ठेवण्यात आला असून त्यांच्यासमोर त्यांची नित्योपयोगाची चांदीची भांडी, अभंग ज्ञानेश्वरी प्रत,भूर्ज पत्र, व लेखन साहित्य ठेवण्यात आले आहे.त्यावेळी समाधीवर मृत्तिकेचे शिवलिंग करून प. पू. सत्यदेवानंदजींनी त्याची पूजा केली.