मंदिराच्या ह्या गाभाऱ्यात मध्यभागी समाधिशिला आहे.त्यावर नित्य अभिषेक पूजा केली जाते. ही समाधिशिला ज्योतिबाच्या डोंगरातून आणवलेल्या काळ्या पाषाणात साडेतीन टप्प्यात कोरलेली आहे. या समाधिशिळेची मापे तंतोतंत आळंदीच्या श्री ज्ञानेश्वरांच्या समाधिशिळे प्रमाणेच आहेत. दि. ०३-०९-१९७५ श्रावणवद्य द्वादशीला म्हणजे प्रथम पुण्यतिथीला विधियुक्त वेदमंत्रांच्या घोषात ह्या समाधिशिळेची प्रतिष्ठापना करण्यात आली.. मागील बाजूस श्री विठ्ठल - रखुमाईच्या सुशोभित मूर्ती ठेवल्या. या मूर्ती जयपूरच्या कारागिरांनी श्याम मार्बलमध्ये बनविल्या आहेत. फाल्गुन वद्य ५ (रंगपंचमी) चे शुभमुहूर्तावर या मूर्तीची प्रतिष्ठापना दि.२७ मार्च १९७८ रोजी पानसरे आजोबा व भाऊराव आठवले यांच्या हस्ते झाली.