संत मंडप

महाद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर समाधी मंदिराचा हा समोरचा   संत मंडप, मंडपातील दोन्ही बाजूंच्या एकूण सोळा खांबावर संतांच्या मूर्ती आणि दोन खांबांमधील कमानीत संतांच्या व देवतांच्या भव्य प्रतिमा आहेत. खांबांवरील मूर्ती याप्रमाणे - श्री अक्कलकोट स्वामी समर्थ,श्री स्वामी रामतीर्थ, श्री एकनाथ महाराज,श्री तुकाराम महाराज, समर्थ श्री रामदास,श्री रामकृष्ण परमहंस, श्री स्वामी विवेकानंद,श्री आदिनाथ भगवान शंकर, श्री मच्छिन्द्रनाथ,श्री गोरक्षनाथ, श्री कानिफनाथ, श्री गहिनीनाथ, श्री निवृत्तीनाथ, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री विश्वनाथ महाराजरुकडीकर आणि श्री गणेशनाथ महाराज या सर्व मूर्ती संगमरवरी असून राजस्थानातील जयपूर येथून बनवून आणण्यात आल्या आहेत.

संतमंडपाच्या सोळा कमानीत पुढीलप्रमाणे देवतांच्या व संतांच्या प्रतिमा आहेत. भगवानश्री महाविष्णू , भगवान श्रीराम, भगवान दत्तात्रेय, श्री वासुदेवानंद सरस्वती,श्री साईबाबा, श्रीपंत महाराज बाळेकुंद्री बेळगाव, श्री मामा महाराज केळकर सांगली, श्री कलावतीदेवी अनगोळ; बेळगाव, श्री गुरुदेव रानडे निंबाळ-कर्नाटक, श्रीमत्आद्यशंकराचार्य, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज,श्री गजानन महाराज शेगाव अशा तऱ्हेने संत आणि देवदेवतांच्यामूर्ती-प्रतिमांच्या अस्तित्वाने प्रसन्न असा हा संत मंडप आहे. म्हणजे मूळचा सभामंडप पण याचे रूपांतर संत मंडपात करण्यात कै.भाऊराव देसाई यांची कल्पकताआहे. वै. हरिभक्त धुंडामहाराज देगलूरकर यांचे शुभहस्ते व त्यांच्या सुश्राव्य वारकरी पद्धतीच्या कीर्तनाने मंदिराचा उदघाटन समारंभ फाल्गुन वद्य पंचमी (रंगपंचमी) दि. २७ मार्च १९७८ रोजी झाला.संत मंडप ६५ फुट बाय ३० फुट आहे.

सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना