कै. भाऊरावजी देसाई यांचा पुतळा

प.पू. स्वामी हयात असेपर्यंत ४० वर्षे व त्यांच्या महासमाधीनंतर २५ वर्षे अशी आयुष्याची ६५ वर्षे ज्यांच्या अथक मेहनतीने आणि प्रगाढ श्रद्धेने सेवा मंडळ संस्था व तिची विविध कार्ये संपन्न झाली त्यांचे प्रमुख मार्गदर्शक व शिल्पकार, स्वामींचे अंतरंग शिष्य कै. भाऊराव देसाई यांचा पुतळा कार्यालया लगतच पिंपळाच्या वृक्षाखाली उभारण्यात आला आहे.मुंबईतील प्रसिद्ध शिल्पकार श्री. सोनवडेकर यांनी हा पुतळा तयार केला असून १९९९साली स्वामींच्या जन्मोत्सवाच्या वेळी कै. भाऊराव देसाई यांच्या प्रथम पुण्यतिथीला पुण्याच्या रामकृष्ण मठाचे प्रमुख प.पू. स्वामी भौमानंद यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना