भक्तनिवासापासून जवळच पुरातन असे विश्वेश्वराचे मंदिर आहे. लाकडी आणि कौलारू असे कोकणी पद्धतीने बांधलेले हे मंदिर आहे. मंदिरात लाकडी खांब तूळया तसेच छतावर उत्तम प्रकारचे नक्षीकाम कोरलेले आहे.आणि या मंदिराबाबत स्वामींनी अभंग ज्ञानेश्वरी मध्ये उल्लेख केला आहे. तो असा-
रत्नागिरी प्रांती । पांवस ग्रामांत । स्वयंभू दैवत। विश्वेश्वर ।।
तया विश्वेशाची । पूर्वजा हातून । भाव भक्तिपूर्ण । सेवा झाली ।।
तेचि पुण्य फळ । लाधलो सकळ । जन्मोनि केवळ । त्यांच्या वंशी ।
मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख असणारा शिलालेख आहे. त्यावर शके १६४९ असे कोरलेले आहे. (म्हणजे इ. स. १७२७)