कोकणातल्या निसर्गरम्य परिसरात पावस येथे राहून प.पू. श्री स्वामीजींनी फार मोठे अध्यात्मिक राष्ट्रीय कार्य केले. प्रसिद्धीपराङ्मुख स्वामींच्या दर्शनाची आस लागून अनेक भक्त पावस येथे येऊ लागले. १९६७ मध्ये सेवा मंडळ संस्था स्थापन झाली तरी स्वामीभक्तांच्या राहण्या-जेवण्याची उत्तम व्यवस्था १९६९ पर्यंत देसाई बंधू करत होते. त्यानंतर स्वरुपाश्रम सुरु झाला आणि १९७२ साली स्वरुपाश्रमाची नवीन इमारत बांधण्यात आली. स्वामी समाधिस्थ झाल्यानंतर एक वर्षांनी समाधी मंदिराचे बांधकाम कै.भाऊराव देसाई ह्यांचे देखरेखीखाली झाले. समाधी मंदिराची सर्व व्यवस्था सेवा मंडळ संस्थेने उत्तम प्रकारे ठेऊन प.पू. स्वामींचे सर्व वाङ्मय आधुनिक काळानुसार ऑडिओव्हिडिओ सीडीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. स्वामींच्या कार्याची माहिती सर्वदूर पोहचावीअधिकाधिक भक्तांना याचा लाभ घेता यावा म्हणून स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे हे अधिकृत संकेतस्थळ स्वामीचरणी अर्पण करताना आम्हाला आनंद होत आहे.

वार्षिक कार्यक्रम

रविवार प्रात: आरती

०३/०१/२०२१ १०.००

पुढे पहा...


रविवार प्रात: आरती

०३/०१/२०२१ १०.००

पुढे पहा...



सर्वांकरिता खिचडीप्रसाद



प्रशस्त भक्तनिवास



नि:शुल्क दवाखाना


समृद्ध पूजा


प्रातः समृद्ध पूजा

वेळ :

नाव १ :
नाव २ :


सायं समृद्ध पूजा

वेळ :

नाव १ :
नाव २ :

आजची आरती

मागील पूजा...

पुढे पहा...

पावस विषयी

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात  पावस हे गाव आहे.  रत्नागिरी हे शहर आणि जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथून १२ किलोमीटर अंतरावर  पावस हे गाव आहे. पूर्वीच्या शेतीच्या उद्योगाला आता आंब्याच्या व्यापाराची जोड मिळाली आहे. आचारविचारांना आधुनिकतेचे वळण लागले असले तरी जुन्या आचारविचारांचे राहणीमान काही खेडेगावातून नमुन्यादाखल पहावयास मिळते. अज्ञान आणि दारिद्र्य यांचे उच्चाटन होत असून उज्ज्वल भविष्यकाळाची सुख स्वप्ने आता पडू लागली आहेत.

कोकण हे अनेक अडचणींचे आगर  असले तरी त्याची जी दुसरी बाजू आहे ती मानवी मूल्यांचे महत्व वाढवणारीच आहे. जेव्हा आपण कोकण सोडून अन्य भाग पाहू लागतो तेव्हा कोकणची ठळक वैशिष्टये दिसू लागतात.

विशाल व घनदाट वृक्षाराजीनी मंडित अशी गावे आणि त्यांत ऋषींच्या आश्रमाप्रमाणे वसलेली दूरदूर  घरे  सबंध बृहन्महाराष्ट्रात अन्यत्र कोठेही पाहावयास मिळणार नाहीत. मधून मधून बाराही महिने वाहणारे पाण्याचे पाट व नारळी पोफळीच्या बागा यांची नयन मनोहर शोभा आणि वसंत ऋतूतील  फलपुष्पादिकांनी नटलेली गावे , वैभवाची वासंतिक प्रभा ही सर्व पाहून कोकणाबाहेरील कोणाही व्यक्तीला कोकणचा हेवा वाटल्याशिवाय कसा राहील ? एरव्ही गरीब असलेला समाज स्वभावानेही गरीबच आहे. पापभीरु व साध्याभोळ्या स्वभावामुळे या भागात एक प्रकारची सात्विक शांतता नांदते.

पुढे पहा...

आजची पूजा

देवस्थान @ ३६०°

ऑडिओ / व्हिडिओ

ॐ राम कृष्ण हरी

स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव सोहळा...

बोध वचने