संप्रदाय चालविण्याचे अधिकार दिलेले तिसरे स्वामीजींचे शिष्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती ज्यांचे पूर्वाश्रमिचे नाव माधव पळणीटकर असून ते संस्कृत विषय घेऊन बी.ए.झालेले होते. तरूण वयातच विरक्ती प्राप्त झाल्याने त्यांनी दि. ९ मे १९६० रोजी विधिवत् संन्यास घेतला. त्यानंतर काही वर्षे आळंदीत वास्तव्य केले.संन्यास घेण्यापूर्वी त्यांनी अक्कलकोट व सज्जनगड येथे बरीच साधना व सेवा केली.सज्जनगडावर पूज्य श्रीधर स्वामींचा त्यांना काही काळ सहवास लाभला.१९६६ साली ते स्वामी स्वरूपानंद यांच्या दर्शनासाठी पावस येथे गेले.दि.१५ जानेवारी १९७३ मध्ये स्वामीजींनी त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार प्रदान केला.पूज्य सत्यदेवनंदानी "गीतस्वरूपानंदायन" हे स्वामींचे काव्यरूप चरित्र लिहिले. अतिशय सुंदर हस्ताक्षर, प्रकांड पांडित्य व उत्कृष्ट काव्य प्रतिभा या गुणांनी युक्त असे सत्यदेवानंद सरस्वती ह्यांनी सिद्धचरित्राचेही संशोधन करून संपादन केले.. त्या पोथीच्या पुनर्मुद्रणासाठी स्वामी सत्यदेवानंद यांनी अतोनात कष्ट घेतले. श्री सिद्धचरित्र हा ग्रंथ पुनर्मूद्रीत करताना सत्यदेवानंदानी त्याचे मूळ हस्तलिखित हस्तगत करण्याचा अथक प्रयत्न केला.१८८३ साली हा ग्रंथ तयार झाला होता.श्री रामचंद्र महाराज तिकोटीकरांचे शिष्य श्रीपतीनाथ यांनी तो ओवीबध्द केला होता.१९६९ साली श्री तिकोटेकर महाराजांचे नातू पुज्य रघुनाथ महाराज पागे यांनी कोल्हापूर मुक्कामी माहिती दिल्यानुसार श्री तिकोटेकर महाराजांची कन्या व योग मार्गातील अधिकारी अशा गोदामाई कीर्तने उर्फ गुंडाक्का ( योगिनी ) यांनी दीक्षा दिलेले सांगलीतील कै.न.ग.कुलकर्णी कारदगेकर यांचेकडे असलेले सदर ग्रंथाचे मूळ हस्तलिखित श्री सत्यदेवानंदानी मिळवून ते स्वामी स्वरूपानंदाना सादर केले.त्यावर हेच तत्कालीन हस्तलिखित असा स्वामीजींनी अभिप्राय दिला.त्याचबरोबर"पावसचा प्रेमदीप" हे स्वामींचे संक्षिप्त चरित्र लिहिले. अत्यंत सुरेल अशा स्वामींच्या तीन आरत्यांपैकी एक संस्कृत आरती सत्यदेवानंद सरस्वती यांनी रचलेली आहे. स्वरूप-पत्र-मंजुषा या ग्रंथाचे त्यांनी साक्षेपी संपादन केले आहे.
आजची पूजा
प्रातः समृद्ध पूजा
सायं समृद्ध पूजा