स्वरूपाश्रमाच्या वास्तूमध्ये तळमजल्यावर मोफत दवाखाना आहे. या दवाखान्यात दरवर्षी सुमारे ३० ते ३५ हजार रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतात. तसेच पावस पंचक्रोशीतील नाखरे, गोळप, रनपार, मेर्वी, कुर्धे,गणेशगुळे व मावळंगे या गावांमधून रुग्णतपासणीसाठी सेवा मंडळाची फिरत्या दवाखान्याची रुग्णवाहिका फिरत असते. याद्वारे सुद्धा रुग्णतपासणी आणि औषधोपचार विनामूल्य केले जातात.
वर्षातून चार ते पाच वेळा सरकारी मोहिमेतून मंदिराच्या महाद्वारात मुलांना पोलिओचा डोस दिला जातो. त्यामुळे बाहेर गावाहून पावसला येणाऱ्या भक्तांची सोय होते. प्राथमिक आरोग्य केंद्र पावस येथे वर्षातून ५ ते ६ वेळा कुटुंब नियोजनाच्या संदर्भात तसेच इतर कॅम्प घेतले जातात. त्यावेळी संस्थेतर्फे सर्व रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना तसेच डॉक्टर, नर्स वगैरे इतर कर्मचाऱ्यांसाठी मूगडाळ-तांदुळाची खिचडी दिली जाते.
आजची पूजा
प्रातः समृद्ध पूजा
सायं समृद्ध पूजा