स्वरूपाश्रम

सन १९६९ साली 'स्वरूपाश्रम'कै. तात्याराव देसाई यांच्या घरी सुरु झाला. पुढे स्वामींच्या दर्शनार्थींची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांच्या व्यवस्थेसाठी सन १९७२ मध्ये भक्तांना प्रसाद-भोजन, निवास, पारायण-उपासनेसाठी स्वामींच्या हयातीत स्वामींच्याच आशीर्वादाने संस्थेने देसाईंच्या 'अनंतनिवास' ह्या घरासमोर रस्त्यापलीकडे 'स्वरूपाश्रमा'ची स्वतःच्या मालकीची पहिली दुमजली इमारत बांधली. सदर आश्रमासाठी कै.भाऊराव देसाई आणि त्यांचे बंधू कै. तात्याराव देसाई यांनी सुमारे अठरा गुंठे जागा सेवा मंडळास बक्षिसपत्राने दिली. स्वामींच्या खोलीपासून ही इमारत जवळ असल्यामुळे व आश्रमात पूर्वीपासून स्वामीभक्त राहिले असल्याकारणाने त्यांच्या नाजूक भावना या इमारतीशी निगडित आहेत.

स्वरूपाश्रमातील वरच्या मजल्यावर हॉलमध्ये पारायणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. १९७३ पासून आजतागायत या हॉलमध्ये मूळ ज्ञानेश्वरी, श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी, श्री एकनाथी भागवत, श्री दासबोध, श्री सिद्धचरित्र या सद्ग्रंथांची सप्ताह-पारायणे सुरु आहेत. सप्ताह करणाऱ्या भक्तांच्या निवास-भोजनाची व्यवस्था स्वरूपाश्रमात करण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त भक्तांनी सप्ताह-पारायणा साठी यावे , अशी सेवा मंडळाची इच्छा आहे. 

आजची पूजा


प्रातः समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :


सायं समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :