श्री स्वामीजींचे ते परम अनुगत भक्त होतेआणि त्यांनीकाही वर्षे प्रत्यक्ष मंदिरात राहून स्वामी सेवा कार्य केले. मंदिरात होणाऱ्या नित्य काकड आरतीची सुरुवात त्यांनीच केली. सकाळी पूजेसाठी लागणाऱ्या फुले आणि तुळशी काढण्यापासून ते मंदिरात होणाऱ्या दोन्ही पूजेच्या आणि आरतीच्या सेवा कार्यात ते मग्न असत. वेंगुर्ल्याहून पावसपर्यंत श्रीमत् स्वामीजींच्या जन्मोत्सवापूर्वी ते पायी दिंडी आणि श्री स्वामीजींच्या पादुकांची पालखी आणीत असत. श्रीमत्स्वामीजींच्या प्रथम दर्शनप्रसंगी नदीवर स्नान करून ओलेत्यानेच दंडवत, प्रणाम करीत करीत ते श्रीमत् स्वामीजींच्या खोलीपर्यंत आले होते. त्यांचे अंतःकरण स्वामीजींच्या भक्ती-भावनेने सदैव भरलेले असे. म्हणूनच आळंदीच्या हैबतीबाबांच्या पायरीप्रमाणेच येथे ह्या पायरीस कै. मामा पडवळ यांचे नाव देण्यातआले आहे.