हा प्रसाद - भोजनासाठीचा मंडप. सेवेकरी वर्ग आणि भक्तनिवासात थांबलेल्या दर्शनार्थी भक्तांना इथे प्रसाद भोजन दिले जाते. नव्या पद्धतीनुसार टेबलखुर्च्यांची सोय करण्यात आलेली आहे.एकावेळी साधारण तीनशे ते चारशे भक्तांना इथे प्रसाद घेता येतो.
प्रसाद भोजन मंडपालगतच स्वयंपाकासाठीचा प्रशस्त हॉल आहे. जन्मोत्सवाच्या वेळी इथेच महाप्रसाद तयार केला जातो. त्यावेळी अन्नदेवतेचीपूजा करण्यात येते. जन्मोत्सवाच्या वेळी सुमारे ३५ ते ४० हजार भक्तांसाठी इथेच महाप्रसाद तयार केला जातो.
आजची पूजा
प्रातः समृद्ध पूजा
सायं समृद्ध पूजा