उत्सव मंडप

समाधी मंदिर आणि स्वामींचे जन्मगृह यामधील जागेत जन्मोत्सव, अन्य सप्ताह शिबिरे, अभ्यास शिबिरे, प्रवचने यासाठी कायमस्वरूपी मंडप उभारण्यात आला आहे.ह्या मंडपात आतील बाजूस श्रीराम-लक्ष्मण-सीता-हनुमंत, व्याघ्राम्बरीदेवी, स्वामी स्वरूपानंद,  श्री राधा-कृष्ण यांच्या सुबकमूर्ती बसवलेल्या आहेत. त्या जयपूर येथून तयार करवून आणण्यात आल्या आहेत.

ह्या उत्सव मंडपात स्वामींच्या जन्मोत्सवाच्या वेळी म्हणजेच मार्गशीर्ष वद्य द्वादशी पूर्वी पाच दिवस स्वामींच्या प्रासादिक ग्रंथांचे वाचन केले जाते. द्वादशीला महाप्रसाद, कीर्तन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम असतो. स्वामींच्या जन्मोत्सवानंतर पौष शु. एकादशी रोजी स्वामींचे सद्गुरू श्री गणेशनाथ तथा बाबामहाराज वैद्य ह्यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जातो. तत्पूर्वी पौष शु. पंचमी ते पौष शु. एकादशी पर्यंत सात दिवस श्रीमत अभंग ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण केले जाते.  द्वादशीला महाप्रसाद आणि संपूर्ण गीता पठणाचा कार्यक्रम होतो. यावेळी जमा होणारी देणगीची रक्कम वेदपाठशाळेस दिली जाते. याव्यतिरिक्त इतर वेळी उत्सव मंडपात आयोजित केल्या जाणाऱ्या शिबिरांमुळे मंदिरातील वातावरण कायम प्रसन्न राहते.

ह्याच उत्सव मंडपात २००३ स्वामी स्वरूपानंद जन्मशताब्दी वर्षांपूर्वी "ॐ राम कृष्ण हरी" या मंत्राचा १००१ कोटी जप पूर्ण करण्यात आला. ह्या जपाचा संकल्प कै. भाऊराव देसाई यांनी केला होता. भाऊराव असेपर्यंत ७०० कोटी जप पूर्ण देखील झाला होता. भाऊरावांच्या निर्वाणानंतर सेवामंडळाने उर्वरित जपसंख्या पूर्ण करून घेऊन भाऊरावांच्या संकल्पाची पूर्तता केली.ह्या पूर्तते नंतर समाधी मंदिरात आरती नंतर ॐ राम कृष्ण हरि हा जप एक माळ केला जातो.

आजची पूजा


प्रातः समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :


सायं समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :