स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर

पावस येथील  स्वामी स्वरूपानंद यांचे समाधी मंदिर. १९७४ साली स्वामी स्वरूपानंद यांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या समाधी गर्तेच्या वरच भव्य असे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे.प्रशस्त आवार,मंदिरात असणारी शांतता, शिस्त, सुव्यवस्था, प्रसन्न हरिमय वातावरण यामुळे दर्शनासाठी येणारे स्वामी भक्त प्रसन्न, आनंदित होतात.मंदिराच्या आवारात कार्यक्रम तसेच पारायणासाठी प्रशस्त हॉल आहे. खिचडीमहाप्रसादाची व्यवस्था आहे. ह्याच परिसरात स्वामींचे जन्मगृह असून ते जसे आहे तसेच  जतन करण्यात आले आहे. ह्या जन्मगृहामध्ये स्वामींची जन्मखोली असून तेथे स्वामींचीमूर्ती आणि स्वामींच्या प्रतिमा ठेवण्यात आलेल्या आहेत. यांचे बाहेरील पडवीतून दर्शन घेता यावे म्हणून तेथे एक खिडकी करण्यात आली आहे.   महाप्रसादासाठी मोठा मंडप उभारण्यात आलेला आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या आत संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची विक्री व्यवस्था आहे तर एका बाजूला स्वामींच्या पूजेसाठी नारळ,कापूर, उदबत्ती मिळण्याची व्यवस्था केली आहे.महाद्वाराच्या बाहेरील बाजूस अत्यल्प दरात स्वामीभक्तांसाठी कोकम सरबत, कैरी पन्हे, चहा व कॉफी यांची सोय करण्यात आलेली आहे.

आजची पूजा


प्रातः समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :


सायं समृद्ध पूजा

वेळ    :
नाव १ :
नाव २ :